Posts

राजगड ते तोरणा

 खरंतर तुम्ही आयुष्यात अनेक प्रवास करतात पण काही प्रवास तुम्ही कधीच विसरु शकत नाही असाच एका प्रवासाबद्दल मी आज व्यक्त होणार आहे नमस्कार मी प्रकाश शेळके एक सह्याद्री भटका आहे नासिक मधील गिरिदुर्ग भटकंती ह्या संस्थेचा सभासद आहे .आम्ही साधारण 3 ते 3.5 वर्षांपूर्वी राजगड ते तोरणा हा range ट्रेक करायचे असे ठरवले होते आमचे गिरिदुर्ग भटकंतीचे प्रमुख गिते मामांनी तसा मेसेज ग्रुपवर टाकला आणि मी माझा होकार कळवला. खरतर राजगड कधीच बघितला नव्हता तसेच तोरणा बाबतीत ही होते त्यामुळे उत्सुकता खूप होती मग काय बॅग पॅक केली आणि नासिकवरून रात्री निघालो पहाटेच्या सुमारास राजगडाचे पायथ्याचे गाव पाली येथून नाष्टा करून प्रवासास सुरवात थोड्याच वेळात प्रशस्थ अश्या पाली दरवाजा जवळ आम्ही पोहोचलो दसऱ्याच्या नंतर गेल्यामुळे तेथे थोडी सजावट होती तिथले अनेक फोटो आम्ही काढले आणि पुढे प्रवास सुरु केला आणि थोड्याच वेळात पद्मावती मंदिराजवळ येऊन आम्ही थांबलो आजचा मुक्काम गडावरच होता मग सर्वांनी आपापल्या बॅगा मंदिरात ठेवल्या आणि साईबाईंच्या समाधीचे दर्शन घेतले स्वराज्याला धाकले धनी देणाऱ्या मातेच्या समाधीची अवस्था खरच ख...