राजगड ते तोरणा

 खरंतर तुम्ही आयुष्यात अनेक प्रवास करतात पण काही प्रवास तुम्ही कधीच विसरु शकत नाही असाच एका प्रवासाबद्दल मी आज व्यक्त होणार आहे

नमस्कार मी प्रकाश शेळके एक सह्याद्री भटका आहे नासिक मधील गिरिदुर्ग भटकंती ह्या संस्थेचा सभासद आहे .आम्ही साधारण 3 ते 3.5 वर्षांपूर्वी राजगड ते तोरणा हा range ट्रेक करायचे असे ठरवले होते आमचे गिरिदुर्ग भटकंतीचे प्रमुख गिते मामांनी तसा मेसेज ग्रुपवर टाकला आणि मी माझा होकार कळवला. खरतर राजगड कधीच बघितला नव्हता तसेच तोरणा बाबतीत ही होते त्यामुळे उत्सुकता खूप होती मग काय बॅग पॅक केली आणि नासिकवरून रात्री निघालो पहाटेच्या सुमारास राजगडाचे पायथ्याचे गाव पाली येथून नाष्टा करून प्रवासास सुरवात थोड्याच वेळात प्रशस्थ अश्या पाली दरवाजा जवळ आम्ही पोहोचलो दसऱ्याच्या नंतर गेल्यामुळे तेथे थोडी सजावट होती तिथले अनेक फोटो आम्ही काढले आणि पुढे प्रवास सुरु केला आणि थोड्याच वेळात पद्मावती मंदिराजवळ येऊन आम्ही थांबलो आजचा मुक्काम गडावरच होता मग सर्वांनी आपापल्या बॅगा मंदिरात ठेवल्या आणि साईबाईंच्या समाधीचे दर्शन घेतले स्वराज्याला धाकले धनी देणाऱ्या मातेच्या समाधीची अवस्था खरच खूप वाईट आहे. मग आम्ही थोडावेळ मंदिरात आराम केला आणि मग गड फिरायला निघालो खरतर वेळ कमी होता आणि गडाचा फेरा खूप अजस्त्र आहे 3 माच्या आहेत संजीवनी माची, सुवेळा माची आणि पद्मावती माची गड पहायला 2 दिवस ही पुरणार नाहीत एव्हडा विस्तीर्ण आहे गडावर बरीच झाडी आहेत राजगडाचा बालेकिल्ला बराच उंचीवर आहे वाट ही अरुंद आहे बालेकिल्ल्यावर राजवाड्याचे थोडे अवशेष आहेत आणि चंद्रकोर तलाव आहेत. पद्मावती मंदिराजवळ पद्मावती तलाव आहे तसेच सरदारांच्या वाड्याचे अवशेष आहेत सर्व गड बघितल्यावर आम्ही संध्याकाळी मंदिरात मुक्कामी होतो मस्त अश्या जेवणावर ताव मारल्यावर रात्री मंदिरात आराम केला पहाटे उठून आम्हाला range ट्रेक ला सुरवात करायची होती.

पहाटे 5 ला सर्वजण उठले आणि सर्व विधी उरकून आम्ही सर्वजण आणि गाईड मंगेश भोसले असे निघालो संजीवनी माची उतरून आम्हाला जायचे होते तसे निघालो दाट जंगल होते उंचच उंच कारवीच्या जंगलातून वाट होती सुरवातीला सर्वजण बरोबर होते पण जशी जशी वाट चालत होती तसे तसे आमच्यात अंतर वाढत होते तास दोन तासांच्या पायपीटी नंतर आम्ही एके ठिकाणी थांबलो तिथे आम्हाला एक 70 ते 75 वयाचे बाबा भेटले पण अजून डोळ्यात करारी पण स्पष्ट दिसत होता नाव त्यांचे कचरे बाबा त्यांनी पाणी दिले आणि वाट दाखवली वाट एकदम सुंदर आहे जवळपास 13 टेकड्या पार केल्यानंतर आपण तोरणा किल्ल्याच्या बुधल्या माचीजवळ पोहोचतो मध्येच बरेच पाणी विक्रेते आपणास भेटतात जवळपास दुपारचे 12 वाजले होते मस्त फोटो शेषन झाले आणि आम्ही पुढे निघालो साधारणतः 1 वाजेपर्यंत आम्ही मेंगाई माता मंदिराजवळ आम्ही पोहोचलो दुपारचे जेवण केले थोडा आराम करून आम्ही झुंझार माची बघून परतीच्या प्रवासास सुरवात केली गड उतरतांना आपणास कळते की याला प्रचंडगड का म्हणतात जवळपास 3 ते 3.5 तास गड उतरवयास लागतात  आता मात्र पुरती वाट लागली होती सकाळी 6 सुरवात केलेला प्रवास दुपारचे 4 वाजले तरी संपत नव्हता शेवटी 4.40 वाजता एकूण 24km चा हा अविस्मरणीय प्रवास संपला अतिशय आठवणीतील हा प्रवास आहे प्रत्येकाने एकदा हा प्रवास करावयास हवा असे मला वाटते.

जय गिरिदुर्ग जय शिवराय

प्रकाश शेळके

गिरिदुर्ग भटकंती

Comments